1922 ते 71 असे जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नाथ पै यांनी 1957, 62 व 67 या तीन लोकसभा निवडणुका समाजवादी पक्षातर्फे जिंकून संसदेत असा ठसा उमटवला की, लोकसभेत त्यांचे भाषण असेल तेव्हा पंतप्रधान नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी आणि विरोधी पक्षांमधील अनेक दिग्गज नेते आवर्जून उपस्थित राहात. बॅ.नाथ पै यांची संसदेबाहेरील लहान असो वा मोठ्या जनसमुदायापुढील भाषणेही तेवढीच रोचक होत असत. राजकारणाबरोबरच, कला, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर त्यांची वाणी बरसू लागली, तर त्यांचे चाहते तर भक्तिरसात डुंबत असतच, पण त्यांचे विरोधक कधी माना डोलवायला लागत हे त्यांचे त्यांनाही कळत नसे. अशा या बॅ. नाथ पै यांच्या संसदेबाहेरील 15 भाषणांचा हा संग्रह आहे.
Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद
₹240.0021 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
Reviews
There are no reviews yet.