गजा हा शरीरविक्री करणाऱ्या माउलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्यांचे जीवघेणे दुःख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी साद घालीत आहेत.
श्याम | Shyam
₹160.0024 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तऐवज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.
Reviews
There are no reviews yet.