मराठी ख्रिस्ती समाजातील अनुभवविश्वाचं व विचारांचं सुबोध ललित शैलीत प्रत्ययकारी चित्रण करणारं हे पुस्तक. या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर डॅनिअलच्या मनात या लेखनाचे बीज पडले. भाषा प्रवाही, मांडणी सुबोध आणि युक्तिवाद तर्कशुद्ध असे हे लेखन आहे. एका अर्थाने धाडसीसुद्धा!
जून 2018 ते जून 2019 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून ‘मंच’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली आणि जानेवारी 2020 मध्ये कुमार केतकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
विशेष म्हणजे, या पुस्तकाला राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा 50 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असा ताराबाई शिंदे यांच्या नावाचा 2020 चा ललित गद्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
विवेकाचा आवाज । Vivekacha Aawaj
₹200.00‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
Reviews
There are no reviews yet.