प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही काळातील स्थित्यंतर हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असलेले खूप कमी लोक आजच्या महाराष्ट्रात आहेत, त्यातील एक महत्त्वाचे नाव सुरेश द्वादशीवार. दोन दशके मुख्यतः प्राध्यापक आणि तीन दशके मुख्यतः पत्रकार-संपादक अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे. धर्म, नीती, तत्त्वज्ञान आणि विज्ञान या परिप्रेक्ष्यात त्यांनी केलेले चिंतन या पुस्तकात आले आहे. आपला समाज समूहाकडून स्वतःकडे कशी वाटचाल करीत आहे, या मन्वंतराचा वेध यात घेतला आहे. विषय गंभीर व वैचारिक आहे, पण ललितरम्य पद्धतीने मांडला आहे.
Sale
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
₹250.00 ₹200.00
₹300.00 ₹240.00
₹125.00 ₹100.00
₹300.00 ₹240.00
₹90.00 ₹70.00
₹300.00 ₹240.00
₹200.00 ₹160.00
₹350.00 ₹280.00
₹250.00 ₹200.00
₹200.00 ₹160.00
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Meet The Author
युगांतर | Yugantar
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
तारांगण | Tarangan
तारांगण (व्यक्तिचित्रे) – यदुनाथ थत्ते, अनंत भालेराव, बाबा आमटे, भिंद्रानवाले, सुरेश भट इत्यादी बारा व्यक्तींवरील ललितरम्य व विचारगम्य लेख.
कोsहम | Ko ham
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्त्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Ekaki | एकाकी
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
Weight | 0.18 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 168 |
Be the first to review “Manvantar | मन्वंतर” Cancel reply
Related products
राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband
1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.
इस्लामचे भारतीय चित्र | Islamche Bhartiya Chitra
इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.
Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद
21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
भारतातील मुस्लिम राजकारण | Bhartatil Muslim Rajkaran
भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
Reviews
There are no reviews yet.