आज कोणती तिथी आहे, हे हजारातल्या नऊशे नव्याण्णव लोकांना सांगता येणार नाही. इतकेच काय सध्या कोणता भारतीय महिना चालू आहे, मार्गशीर्ष की पौष की माघ हेही पुष्कळांना माहीत नसते. व्यवहारात आपण इंग्रजी महिने स्वीकारले आहेत ना? झालं तर मग ! त्या-त्या (इंग्रजी) महिन्यात आपण घराबाहेर पडलो की, अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहायला मिळतात याकडे मला लक्ष वेधायचे आहे- बस्स. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे माझे जास्त लक्ष आहे. जमिनीवर घडणारे ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे’ एवढेच मला अभिप्रेत आहे.
श्यामची पत्रे | Shyamchi Patre
₹160.00श्यामची पत्रे (पत्रसंग्रह) – साने गुरुजींनी आपला कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकलेला पुतण्या वसंताला लिहिलेली पत्रे – 1942 ची धामधूम सुरू होण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रांमधून गुरुजींचे आत्मगत ठळकपणे कळते.
Reviews
There are no reviews yet.