15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे हे 75 वे वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वाटचालीत साधनाला बालकुमारांचे जसे अगत्य होते तसेच तरुणाईचेही होते. त्यामुळे बालकुमार वाचकांसाठी वर्षातून एखादा विशेषांक आणि युवा वर्गाची अभिव्यक्ती नियमित अंकांमध्ये, ही परंपरा साधनात कायम राहिली आहे. मात्र 2007-08 मध्ये म्हणजे हीरकमहोत्सवी वर्षात साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाच वर्षांनी युवा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली.
Sadhana Yuva Diwali 2022 | साधना युवा दिवाळी 2022
₹60.00या अंकात विविध क्षेत्रातील पाच कर्तबगार तरुण तरुणींच्या मुलाखती आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून या मुलाखती घोसात आल्या आहेत. या मुलाखती युवकांच्याच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या वाचकांच्या विचारांचे क्षितिज रुंदावतील आणि मुख्य म्हणजे समाजसन्मुख जगण्यासाठी अधिक आशादायी भावना मनात जागृत करतील.
Reviews
There are no reviews yet.