महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची स्थिती नेमकी आहे तरी कशी, याचा शोध घेण्यासाठी राजा शिरगुप्पे यांनी जुलै-ऑगस्ट 2009 मध्ये भ्रमंती केली, त्यातून साकारलेली ही शोधयात्रा. ही शोधयात्रा वाचताना लक्षात येईल, ‘दुर्गम भाग’ म्हणजे केवळ डोंगरदऱ्या वा जंगलप्रदेश नव्हे; जिल्ह्याच्या ठिकाणापासून दहा-वीस कि.मी. अंतरावरील परिसरही ‘दुर्गम’ या संज्ञेला पात्र ठरतो आहे!
Sale
₹250.00 ₹200.00
₹150.00 ₹120.00
₹350.00 ₹280.00
₹200.00 ₹160.00
₹90.00 ₹70.00
₹200.00 ₹160.00
₹550.00 ₹440.00
₹175.00 ₹140.00
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची | Shodhyatra : Gramin Maharashtrachi
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.
Meet The Author
शोधयात्रा : ईशान्य भारताची | Shodhyatra : Ishanya Bhratachi
शोधयात्रा : ईशान्य भारताची (रिपोर्ताज) – ईशान्य भारतातील सात राज्यांत भ्रमंती करून, तेथील समाजजीवन रेखाटणारे लेखन.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 136 |
Be the first to review “शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची | Shodhyatra : Gramin Maharashtrachi” Cancel reply
Related products
शिंग फुंकिले रणी | Shing Funkile Rani
जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…
Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला
हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे । Prashna Tumcha Uttar Dabholkaranche
हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.
कहाणी पाचगावची | Kahani Pachgavchi
कहाणी पाचगावची (सामाजिक संशोधन) – चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने मागील दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास-संशोधन करून लिहिलेले पुस्तक.
अवघी भूमी जगदीशाची | Avaghi Bhoomi Jagadishachi
देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णित होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
Reviews
There are no reviews yet.