साने गुरुजींनी 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना फक्त पाच दिवसांत लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक, नंतरच्या नऊ दशकांत महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात माईलस्टोन ठरले. त्याच पुस्तकावर आधारित, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट 1953 मध्ये आला, त्यानेही नंतरच्या सात दशकांत महाराष्ट्राच्या जनमनात स्थान मिळवले. आणि तरीही 2023 मध्ये, दिग्दर्शक सुजय डहाके यांनी त्याच पुस्तकावर नवा चित्रपट आणला आहे. तो जाणीवपूर्वक कृष्णधवलच केला आहे. साने गुरुजी आणि श्यामची आई यांच्या प्रतिमा नव्याने उजळून काढणारा, किंबहुना त्या प्रतिमांना नवे आयाम बहाल करणारा असा तो झाला आहे. त्या चित्रपटातील विविध प्रसंगांतील छायाचित्रे समाविष्ट करून श्यामची आई या पुस्तकाची काढलेली ही नवी आवृत्ती आहे. मूळच्या आशयाला व अर्थातच त्या विषयाला अधिक सुबोध व आकर्षक आणि अधिक गहन व गंभीर पद्धतीने सादर करण्यासाठी ही आवृत्ती उपयुक्त ठरेल.
नामदार गोखले चरित्र | Namdar Gokhale Charitra
₹240.001866 ते 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृती वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी 1925 मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.
Reviews
There are no reviews yet.