जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी ‘आई’ संबंधी लिहिले असेल, कविता केल्या असतील, गोष्टी लिहिल्या असतील. पण मराठी भाषेत साने गुरुजींनी ‘श्यामची आई’मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल, असे मला मुळीच वाटत नाही. अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.
-आचार्य अत्रे
Reviews
There are no reviews yet.