एक थिअरॉटिकल मित्र प्रॅक्टिकल मित्रांशी बोलतोय, अशी या सदराची मध्यवर्ती कल्पना होती. त्यामुळे अनेक लेखकांचे, पुस्तकांचे संदर्भ येणं अपरिहार्य होतं. भाषा, विचार आणि चिकित्सा या तीन संकल्पनांवर या सदरात जास्तच भर दिला गेला, असं आता वाटतंय. पण हे तीनही गुणविशेष तरुणाईचे आहेत, म्हणून समाधान वाटतंय ! एकही सूचना न करता, एकही शब्द न कापता साधनाचे संपादक हे लेख प्रसिद्ध करीत होते. त्यामुळे विचार करण्याचा आणि ते विचार व्यक्त करण्याचा आनंद मी पुरेपूर उपभोगत होतो.. तारुण्याचा यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता ?
Saptahik Sadhana Diwali 2024 | साप्ताहिक साधना दिवाळी 2024
₹140.00हा अंक तयार करताना दोन ते तीन हजार शब्दांचे लेख व वर्तमानाशी निगडित आशय-विषय आणि जास्तीत जास्त नवे लेखक अशी मध्यवर्ती कल्पना समोर ठेवली. ताज्या घटना-घडामोडींचे निमित्त करून हे 13 लेख प्रसिद्ध करीत आहोत.
Reviews
There are no reviews yet.