परंपरा ही एक बाब आहे, तर आधुनिकता दुसरी. परंपरेत रमणाऱ्याला आधुनिकता समजून घेणे अवघड जाते, तर आधुनिकाला परंपरेत महत्त्वाचे काही असेल असे वाटतच नाही. परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये, म्हणजेच उंबरठ्यावर उभे राहून दोन्हीकडे समदृष्टीने पाहणाऱ्या व्यक्तीला दोन्ही गोष्टी समजून घेता येतात. त्यांच्यातील ग्राह्यांश तेवढा ठेवून अनावश्यक बाबी टाकून देता येतात. भारतासारख्या प्रदीर्घ इतिहासाचा वारसा लाभणाऱ्या देशासाठी असे उंबरठ्यावरून पाहणे उपयुक्त ठरेल अशी माझी धारणा आहे.
मुलांसाठी पथेर पांचाली | Mulansathi Pather Panchali
₹120.00या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह….!
Reviews
There are no reviews yet.