कहाणी पाचगावची | Kahani Pachgavchi
₹160.00कहाणी पाचगावची (सामाजिक संशोधन) – चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने मागील दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास-संशोधन करून लिहिलेले पुस्तक.
कहाणी पाचगावची (सामाजिक संशोधन) – चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने मागील दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास-संशोधन करून लिहिलेले पुस्तक.
असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण 13 लेखांचा संग्रह.
चले जाव (भाषणसंग्रह) – 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
हिरवे पान (पत्रसंग्रह) – फर्ग्युसन कॉलेजमध्ये वयाच्या विशीत असताना संकल्प गुर्जर या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लिहिलेली पत्रे.
अशानं आसं व्हतं (आत्मकथनात्मक) – एका दहा – बारा वर्षांचा खेड्यातील मुलगा त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी सांगतो ते अनुभव खानदेशातील तावडी बोलीत पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.
वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या 67 स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.