Shop

झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra

280.00

झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्व जण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्‍य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.

वाचावे कसे हे शिकवण्यासाठी ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे ‘द क्राउड’, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे ‘द ट्रू बिलिव्हर’, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे ‘झुंडी’ आणि ‘सच्चा अनुयायी’ या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पूरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)

            

नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang

240.00

देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारांपासून प्रभारी राजदूतांपर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळुवार संवाद साधत आहेत.

     

राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband

240.00

1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.

     

चिनी महासत्तेचा उदय | Chinee Mahasattecha Uday

440.00

1949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे !

     

जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru

280.00

जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.

 

            

 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat

280.00

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.

     

माझी वाटचाल | Mazi Vatchal

240.00

जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रितीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.

     

हाजीपीर आणि कांजरकोट | Hajipeer Ani Kanjarkot

120.00

पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.

             

1 25 26 27 28