शाळाभेट | Shalabhet
₹140.00शाळाभेट (शिक्षणचित्रे) – सर्जनशील उपक्रम राबवत शिक्षणातील रचनावादी उत्तम उदाहरणे देणाऱ्या 16 शाळांची ओळख.
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
₹200.00लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
वैचारिक घुसळण | Vaicharik Ghusalan
₹280.00जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टीकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.