Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार
₹160.00साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
Aikta Daat । ऐकता दाट
₹160.00अट एकच… ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
Charvak। चार्वाक
₹160.00आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹120.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर