असेही विद्वान | Asehi Vidwan
₹120.00असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य | Islam Aani Sahishnuteche Bhavitavya
₹120.00उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
हाजीपीर आणि कांजरकोट | Hajipeer Ani Kanjarkot
₹120.00पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.
तेजसी | Tejasi
₹120.00या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे
आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे | Acharya Javadekar : Letters and Memoirs |
₹100.00एका पत्राचा अपवाद वगळता उपलब्ध सर्व पत्रे आचार्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली आहेत. त्यांच्या पिढीतल्या काही स्त्रियांनी आत्मचरित्रवजा लेखन केले असले तरी ती बहुतेक अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आपल्या पतींची लिहिलेली चरित्रेच आहेत. एकूणच स्त्रियांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पतीविषयीचाच पसारा जास्त असतो. मग त्या जुन्या जमान्यातल्या स्त्रिया असोत की नव्या जमान्यातल्या. मात्र, आजवरच्या पुरुषांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पत्नीला अजिबातच स्थान दिसत नाही. क्वचित असले तरी अगदी पुसट अंधुक चित्रासारखे ! तत्कालीन पत्रव्यवहारांतूनही पत्नीविषयीचा भाव मोकळेपणाने व्यक्त झालेला दिसत नाही. आचार्यांसारख्या धीर-गंभीर वृत्तीच्या आणि समाजालाच आयुष्य वाहिलेल्या व्यक्तीबाबत तर ही बाब उंबराला फूल येण्याइतकीच दुर्घट म्हणावी लागेल.
परंतु योगायोगाने या सुमारे 21-22 पत्रांतून हे अघटित घडलेले दिसते. आचार्य जावडेकर या व्यक्तीचा आपल्या कुटुंबीयांविषयीचा, पत्नीविषयीचा भाव व्यक्त करणारा अस्सल पुरावा म्हणून ही पत्रे महत्त्वाची आहेतच. पण तत्कालीन दांपत्यजीवनातील दृढ परंतु अभिजात संयमी भावबंधाचे लेखन म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे असे वाटते.
सुशीलाबाईंच्या लेखनातून दिसणारे तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक जीवनाचे चित्र आणि विशेषतः स्त्रीजीवन हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ध्येयनिष्ठ व्यक्तींच्या जीवनातील हे वास्तव लेखन समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे
चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹100.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर