जिंकुनी मरणाला | Jinkuni Maranala
₹120.00कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही.
वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला.
त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत.
हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.
संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.
– ना. ग. गोरे
धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam
₹140.00‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
₹160.00एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?