मानवजातीची कथा | Manavjatichi Katha
₹320.00या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत.या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात :
संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.
‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा ‘ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.