कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा | Kanosa- Bhartatil Muslim Manacha
₹80.00कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.
या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह…!
आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.