इस्लामचे भारतीय चित्र | Islamche Bhartiya Chitra
₹70.00इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.
मुस्लिम समाजातील वाहते वारे | Muslim Samajatil Vahate Vaare
₹120.00‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.
सोनार बांगला | Sonar Bangala
₹100.001971 ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला, त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!
मुलांसाठी पथेर पांचाली | Mulansathi Pather Panchali
₹120.00या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह….!
भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank
₹50.00क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.
पत्र-पाथेय | Patra-Patheya
₹320.00भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.
मानसरंगचे अंतरंग | Manasrangche Antarang
₹80.00मन, मनाचे व्यवहार, मानसिक आजारांची, लक्षणे, कारणे आणि उपाय यांवर काही वर्षांपूर्वी डॉ. हमीद दाभोलकर या मनोविकार तज्ज्ञासोबत, मी आणि राजू इनामदार यांनी ‘मनोविकार संवाद कार्यशाळा’ घेतली. त्यात आम्ही संवादाच्या विविध पद्धतींवर काम केले. विविध आजारांची माहिती लोकांना देण्याकरता पोस्टर, घोषवाक्य, गाणी आणि नाटक यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यात घुसळण होऊन अचूक शास्त्रीय माहिती ही कलात्मक संवादी पद्धतीने देण्याचे मार्ग आम्हाला दिसले. त्यातील एक मार्ग म्हणजे Community Theatre सुरू करून लोकांशी संवाद साधणे हा होता. नाटक करताना करणारे आणि बघणारे या दोघांचेही शिक्षण होते. विचारांची बीजे दृक्-श्राव्य रूपातून खोलवर रुजतात. जिवंत अनुभव हा प्रभावशाली असतो. हे सर्व लक्षात घेऊन ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ भरवावा असे ठरले. तीन वर्षे ते महोत्सव भरले. त्या संपूर्ण प्रक्रियेची झलक दाखवणारी ही पुस्तिका आहे.



