इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच नाते विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रितीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.
Reviews
There are no reviews yet.