सामूहिक शहाणिवेचा ऱ्हास होत असला तरी समाजाला त्याची गंधवार्ता असू नये, असा हा काळ आहे. विचार-सामंजस्य यांना थारा नाही, मानसिक-भावनिक समतोलाचा ठहराव नाही, अशा एकाच दिशेने स्वमग्न झुंडीच्या झुंडी वाट तुडवीत जात आहेत. प्रत्येक काळात समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी विचार व कृती देणाऱ्या विवेकी व्यक्ती निष्ठेने कार्यरत असतात. त्यांच्या विचारांतून अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला नवी उमेद मिळू शकते. अट एकच…’त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
₹175.00 ₹140.00
Aikta Daat । ऐकता दाट
अट एकच…’त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
Meet The Author
Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला
हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यात अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 152 |
Related products
Islam Aani Sahishnuteche Bhavitavya | इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
Asehi Vidwan | असेही विद्वान
असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
Dickens and Trolop । डिकन्स आणि ट्रोलॉप
डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटीश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहलेले दोन दीर्घ लेख.
अहा, देश कसा छान! | Aha, Desh Kasa Chhan
1990 दरम्यान त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय, नेपाळ या प्रदेशांत भ्रमंती केली, त्यावर आधारित लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांचेच ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
MI BHARUN PAVALE AHE। मी भरून पावले आहे
मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta | बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता
रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू १९९५ साली झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. २५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.
Reviews
There are no reviews yet.