हल्लीच्या भाषेत हा नॉस्टेल्जिया (स्मरण-रंजन) असेल. आयुष्याच्या उतरणीवर त्यांचंही एक महत्त्व असतं, तृप्ती असते. ज्या स्मरण-रंजनाने पुढची पिढी दुखावली जात नसेल, त्यांच्या उणीवांवर बोट ठेवलं जात नसेल, त्यांना उपद्रव होईल अशा चढ्या आवाजात त्याची अभिव्यक्ती नसेल, तर ते स्मरणरंजन कर्त्याबरोबरच ऐकणाराला, वाचणारालाही सुखद होतं, मार्गदर्शकही होतं. त्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाच्या पाऊलखुणाही असतात. तुमच्या या लेखनात अशा सामाजिक-सांस्कृतिक पाऊलखुणा अनेक ठिकाणी दिसतात. तो अनुभव एका व्यक्तीचा असला तरी ती व्यक्ती सहृदय व अनुभवसंपन्न असेल, तर त्या खुणा समाजाच्या एका ऐतिहासिक टप्प्याच्या पुराव्यासारख्या असतात.
तारा भवाळकर
Reviews
There are no reviews yet.