सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या गुरू-शिष्यांच्या परंपरेने ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. जगभरचे तत्त्वचिंतन या परंपरेला वंदन करीत आले. त्यापैकी प्लेटोने त्याचे तत्त्वज्ञान दोन भिन्न शैलींत मांडले. पहिली सूत्रबद्ध आणि ग्रांथिक, तर दुसरी नाटकाच्या रोचक रूपातली. पहिली रचना अभ्यासकांसाठी, तर दुसरी सर्वसाधारण वाचकांसाठी. काळाचा महिमा असा की, त्याच्या अकादमीला लागलेल्या आगीत त्याची सूत्रबद्ध रचना जळून नाहीशी झाली. लोकांच्या भाषेत लिहिलेले त्याचे चिंतनच तेवढे पुढे टिकले. त्याच चिंतनाने तत्त्वज्ञ म्हणून प्लेटोला अजरामर केले. ज्ञान हा शैलीने बाधित न होणारा जनसामान्यांचा हक्क आहे, हा या घटनेचा अर्थ… ‘कोऽहम’ ही कादंबरी त्या दिशेने प्रवास करणारी…
View cart “हे मित्रवर्या | He Mitravarya” has been added to your cart.
Sale
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
₹200.00 ₹160.00
₹300.00 ₹240.00
₹125.00 ₹100.00
₹200.00 ₹160.00
₹200.00 ₹160.00
₹75.00 ₹60.00
₹200.00 ₹160.00
₹150.00 ₹120.00
₹250.00 ₹200.00
कोsहम | Ko ham
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्त्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.
Meet The Author
युगांतर | Yugantar
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
तारांगण | Tarangan
तारांगण (व्यक्तिचित्रे) – यदुनाथ थत्ते, अनंत भालेराव, बाबा आमटे, भिंद्रानवाले, सुरेश भट इत्यादी बारा व्यक्तींवरील ललितरम्य व विचारगम्य लेख.
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Ekaki | एकाकी
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
| Weight | 0.2 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
| Size | M, S |
| Pages | 204 |
Be the first to review “कोsहम | Ko ham” Cancel reply
Related products
माझी काटेमुंढरीची शाळा । Mazi Katemundharichi Shala
माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
उघडा, दरवाजे उघडा…!। Ughada, Darwaje ughada…!
हिंदीतील प्रसिद्ध लेखक कृष्ण चंदर यांच्या ‘दरवाज़े खोल दो’ या मूळ उर्दू नाटकाचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे.
श्यामची पत्रे | Shyamchi Patre
श्यामची पत्रे (पत्रसंग्रह) – साने गुरुजींनी आपला कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकलेला पुतण्या वसंताला लिहिलेली पत्रे – 1942 ची धामधूम सुरू होण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रांमधून गुरुजींचे आत्मगत ठळकपणे कळते.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.





Reviews
There are no reviews yet.