1922 ते 71 असे जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बॅ.नाथ पै यांचे जीवन म्हणजे अकाली विझलेला एक झंझावात होता. कोकणात जन्माला आलेला हा माणूस तारुण्याच्या उंरबठ्यावर असताना 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतो, स्वातंत्र्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जातो, 1952 ची निवडणूक बेळगावमधून लढवण्यासाठी भारतात परत येतो, त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत इंग्लंडला जातो. बॅरिस्टर होऊन ऑस्ट्रियन मुलीशी विवाह करून भारतात येतो आणि 1957, 62 व 67 या तिन्ही निवडणुका कोकणातील राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या वतीने जिंकतो, लोकसभेत उत्तम संसदपटू म्हणून काम करताना देशाचे लक्ष वेधतो आणि वयाची पन्नाशी गाठायच्या आत हे जग सोडून जातो. अशा या झंझावाताचे त्याच्या जवळच्या मित्राने व सहकाऱ्याने रेखाटलेले हे चरित्र आहे.
राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband
₹240.001947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.
Reviews
There are no reviews yet.