भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, साने गुरुजींनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा पहिला प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून ‘अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे, अन्यथा मी आमरण उपोषण करीन’ अशी घोषणा केली. आणि जानेवारी ते एप्रिल 1947 या चार महिन्यांत जनजगृती करण्यासाठी झंझावती दौरा केला. त्या काळात एकट्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी 400 पेक्षा अधिक सभा घेतल्या. तेव्हा गावोगावची 300 मंदिरे खुली झाली. मात्र पंढरपुरच्या बडव्यांनी दाद दिली नाही, म्हणून 1 मे 1947 रोजी गुरुजींनी उपोषण सुरु केले… आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. तो एकूण घटनाक्रम भारतीय समाजजीवनाच्या कुरूपतेचे दर्शन घडवणारा होता, मात्र शतकानुशतकांचे जडत्व लाभलेल्या रूढी परंपरा (उदात्त ध्येयवादाच्या बळावर) मोडीत काढता येतात, याची प्रचिती देणाराही होता. त्याची एक झलक अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा | Kanosa- Bhartatil Muslim Manacha
₹80.00कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
Reviews
There are no reviews yet.