Shop

Saleनवी पुस्तके

रानडे, गांधी आणि जीना | Ranade, Gandhi ani Jinnah

200.00

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘रानडे, गांधी अँड जीना’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे.

या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात.

या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.

Saleनवी पुस्तके

बाभळीच्या बाया | Babhalichya Baya

200.00

“प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी ‘सुरवंट ‘मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या… कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं… अगदी माझ्या बायांसारखं”

माझी वाटचाल | Mazi Vatchal

240.00

जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रितीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.

     

राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband

240.00

1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.

     

नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang

240.00

देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारांपासून प्रभारी राजदूतांपर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळुवार संवाद साधत आहेत.

     

धर्मांधता राज्यसंस्थेवरील घोर संकट । Dharmandhata : Rajyasansthevaril Ghor Sankat

240.00

उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ख्याती असलेल्या मधु लिमये यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘रिलीजियस बिगॉरिटी’ आणि ‘लिमिट्स ऑफ ऑथॉरिटी’ या पुस्तकांतील निवडक लेख.

     

 

Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा

240.00

मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.

     

मला प्रभावित करून गेलेला सिनेमा । Mala Prabhavit Karun Gelela Cinema

240.00

मला प्रभावित करून गेलेला सिनेमा (लेखसंग्रह) – सिनेमातील लोक, सिनेमाचे समीक्षक आणि साहित्यिक अशा तीन घटकांतील 27 व्यक्तींनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या प्रत्येकी एका सिनेमाविषयी लिहिलेले लेख.

     

1 19 20 21 30