गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.
खंड 1 (एकूण पृष्ठे – 544) – ‘गांधी : व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.
खंड 2 (एकूण पृष्ठे – 420) – ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ या दुसऱ्या खंडामध्ये सॉक्रेटिस-टागोरांपासून ते आंबेडकर-लोहियांपर्यंत एका विशिष्ट विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधी विचारांची चर्चा केली असल्याने गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भचौकट प्राप्त झाली आहे. यातूनच आपल्याला आजच्या समस्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी दिशा प्राप्त होणार आहे.
खंड 3 (एकूण पृष्ठे – 300) – ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’ या तिसऱ्या खंडात भाषा, विज्ञान, जीवनशैली यांसारख्या गांधीजींच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श केला आहे. गांधी विचारांच्या परिपूर्ण आकलनासाठी या वेगवेगळ्या विषयांतून भेटणारे गांधी महत्त्वाचे आहेत. जणू काही कॅलिडोस्कोपमधील अनेक पैलूंतून निर्माण होणारी सुघड आकृती. म्हणूनच येथे अनेक खुर्दमधून आपल्याला आकळतात बुद्रुक गांधी.
दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1350 रुपये.
सवलतीत 1050 रुपये.
दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1350 रुपये.
सवलतीत 1050 रुपये.