Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 177 |
₹200.00 ₹160.00
Asidhara | असिधारा
केशव ऊर्फ बंडू गोरे,समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग, कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद.
आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा ‘बायोडेटा’. पण बायोडेटामध्ये मावणारं हे व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची त्यांना योग्य जाण होती.
केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका संपूर्ण काळाचं ते दस्तऐवजीकरण होतं. हा दुर्मीळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे….
.
Meet The Author
No products were found matching your selection.
Related products
Charvak। चार्वाक
आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
Shyamchi Aai Watchal eka Sahityakrutichi | श्यामची आई वाटचाल एका साहित्यकृतीची
‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल 88 वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे.
Aikta Daat । ऐकता दाट
अट एकच… ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas
डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Reviews
There are no reviews yet.