ईश्वर, धर्म, धार्मिक कर्मकांडे यांना विरोध करणारा चार्वाकांचा पंथ पांडवाच्या काळातही आदरणीय होता हे विशेष आहे. वनपर्वात द्रौपदी कृष्णाला सांगते, ‘लोकायत मताचे ग्रंथ शिकवायला तिच्या वडिलांनी काही पुरोहितांची नेमणूक केली होती.’ तात्पर्य, चार्वाक आदरणीय होते, त्यांचे ग्रंथ अस्तित्वात होते. ते शिकवले जात होते आणि त्यांचे पुरोहितही होते. आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
₹200.00 ₹160.00
Charvak। चार्वाक
आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
Meet The Author
युगांतर | Yugantar
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
तारांगण | Tarangan
कोsहम | Ko ham
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 132 |
Related products
वाचता वाचता । Vachata Vachata
गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.
इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य | Islam Aani Sahishnuteche Bhavitavya
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
सार्क विद्यापीठातील दिवस | SAARC Vidyapithatil Divas
सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.
डिकन्स आणि ट्रोलॉप । Dickens and Trolop
डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटिश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहिलेले दोन दीर्घ लेख.
मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe
मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta | बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता
रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.
Reviews
There are no reviews yet.