देश-विदेशांतला प्रवास हा आंतरिक आनंद देणारा अनुभव असतो. कालांतराने दुधाचे दही व्हावे त्याप्रमाणे हे अनुभव आंबून त्यांची अनुभूती होते. छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचे किंवा निसर्गाचे जशाचे तसे प्रतिबिंब पडल्याचे दिसते. चित्राची गोष्ट वेगळी आहे. चित्रकार एखादी व्यक्ती किंवा निसर्ग पाहताना आपल्या मनात भावनांचे जे कल्लोळ उसळले त्याचे मिश्रण आपल्या चित्रात करत असतो. या पुस्तकात अंतर्भूत झालेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीत लिहिली आहेत. मात्र ही निव्वळ प्रवासवर्णनं नाहीत. लेखक त्या-त्या देशांच्या नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक रसायनात आकंठ बुडाला आहे. त्यामुळे लेखकाने प्रभाववादी शैलीने लेखन केलं आहे, ज्याप्रमाणे चित्रकार प्रभाववादी (इम्प्रेशनिस्ट) शैलीतून चित्रे काढतो, म्हणूनच या प्रवासवर्णनात वाचकाला लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांचे अस्तित्व जाणवते. मात्र, त्याच्या मनात त्या-त्या देशांत प्रवास करण्याची इच्छादेखील निर्माण करते.
25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य | 25 Varshantil Dalitanche Swatantrya
₹160.00भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.
तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.
Reviews
There are no reviews yet.