23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लोकमान्य टिळक यांना लाभले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1956 मध्ये त्यांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस समितीने घोषित केली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक तीन पुस्तकांना विभागून दिला. त्यातील एक पुस्तक होते अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र. ते दोघेही त्या वेळी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली नव्हती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाउस, दिल्ली यांनी प्रकाशित केले. त्याला त्या वेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. नंतर त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र, त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला नव्हता. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आणि ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ, ही दोन निमित्तं साधून प्रस्तुत अनुवाद प्रकाशित केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant
₹70.00हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.
मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.
बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.
Reviews
There are no reviews yet.