गजा हा शरीरविक्री करणाऱ्या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्यांचे जीवघेणे दुःख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी साद घालीत आहेत.
View cart “Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा” has been added to your cart.
Sale
₹150.00 ₹120.00
₹175.00 ₹140.00
₹100.00 ₹80.00
₹150.00 ₹120.00
₹175.00 ₹140.00
₹175.00 ₹140.00
Majhe Vidhyarthi | माझे विद्यार्थी
माझे विद्यार्थी (व्यक्तिचित्रे) – एका प्राथमिक शिक्षकाला त्याच्या कारकिर्दीत भेटलेली काही अफलातून यशस्वी व अयशस्वी मुले- मुली.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 152 |
Be the first to review “Majhe Vidhyarthi | माझे विद्यार्थी” Cancel reply
Related products
Aath Prathamik Shikshakance Aatmvrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं
आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं (कार्यकथन) – ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील आठ शिक्षकांनी आपल्या शाळांच्या शैक्षणिक वाटचालीवर टाकलेला दृष्टीक्षेप.
Shalabhet | शाळाभेट
शाळाभेट (शिक्षणचित्रे) – सर्जनशील उपक्रम राबवत शिक्षणातील रचनावादी उत्तम उदाहरणे देणाऱ्या १६ शाळांची ओळख.
Majhe Shikshak | माझे शिक्षक
माझे शिक्षक (आठवणी) – तत्वनिष्ठ राजकारणी खताळ – पाटील यांनी वयाच्या ९९ व्य वर्षी लिहलेले व अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या सामान्य व असामान्य म्हणाव्या अशा २० व्यक्तींविषयी माहिती देणारे पुस्तक.
Na Petlele Dive | न पेटलेले दिवे
न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी १४ लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली.
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.