कार्यक्षम प्रशासक आणि सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असणारे लक्ष्मीकांत देशमुख 2014 मध्ये आय.ए.एस. सेवेतून निवृत्त झाले आणि 2018 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांची एक दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकातून क्रमश: आठ भागांत प्रकाशित केली होती. ती संपूर्ण मुलाखत आता एकत्रित स्वरूपात पुस्तकरूपाने आणली आहे. ही दीर्घ मुलाखत वाचून त्यांच्यातील प्रशासकाला व लेखकाला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ हे विशेषण किती योग्य आहे याची प्रचिती येईल.
Bakhar: Bharatiy Prashasanachi | बखर: भारतीय प्रशासनाची
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
Reviews
There are no reviews yet.