Shop

सुंदर पत्रे । Sundar Patre

200.00

सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.

सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.

साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.

– ना. ग. गोरे

             

नारायणीय – निवडक ना. ग. गोरे | Narayaniya – Nivadak N. G. Gore

280.00

कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. – ना. ग. गोरे

     

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा | Kanosa : Bhartatil Muslim Manacha

70.00

कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू-मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.

     

इस्लामचे भारतीय चित्र | Islamche Bhartiya Chitra

70.00

इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.

     

गोष्टी देशांतरीच्या | Goshti Deshantarichya

100.00

एकाकीपणात गजबज भेटते. पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो. एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो. आतले रंग, आतल्या रेषा रचतात निराळाच अवकाश सर्वांत मोठी आकृती आहे ती मात्र पंचखंडी पृथ्वी अखंड अवकाश… – वसंत बापट

     

अहा, देश कसा छान! | Aha, Desh Kasa Chhan

100.00

1990 दरम्यान त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय, नेपाळ या प्रदेशांत भ्रमंती केली, त्यावर आधारित लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांचेच ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

     

बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani

100.00

काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट

     

1 22 23 24 28