साहित्य

Saleनवी पुस्तके

Eka Kombdyache Abhivyakti Swatantrya | एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

100.00

ही कहाणी आहे गब्रू नावाच्या कोंबड्याची, त्याच्या आरवण्यासंबंधीची. गब्रूच्या आरवण्यामुळे झोपमोड होते अशी तक्रार केली जाते. त्यावेळेस कोंबड्याच्या बाजूने उभी राहतात सृजन कट्ट्यावरची मुलं. ही मुलं गोष्टी ऐकतात, सांगतात आणि लिहितातही!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मोल त्यांनी ओळखलंय. चिकित्सक, संवादी वृत्ती. आणि संवेदनशीलता यामुळे या मुलांना परीक्षा, अभ्यास, शिकणे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याची डोळस दृष्टी आहे. कोंबड्याच्या आरवण्याच्या नैसर्गिक अभिव्यक्ती हक्कावर गदा येण्याची वेळ येते तेव्हा, ही धडपडणारी मुलं पुढाकार घेतात. पुढे होतो नाट्यमय प्रवास… त्यातून कुमारवयातील ऊर्जेला योग्य वाट मिळते. आणि मग मुलंही मोठ्यांपुढे आदर्श निर्माण करतात, याचा वस्तूपाठ आपल्यासमोर येतो.

कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे उपदेश न करता कल्पना आणि विचार करायला लावणारी आहे. परिणामी ही कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांविधानिक मूल्ये याविषयी जाणीव जागृती करते. कादंबरीत आलेल्या लोककथा, लोकगीते आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यामुळे एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. संघर्ष, नाट्य, चमत्कार, अद्भुत प्रसंग यामुळे कुतूहल वाढते. कहाणी उत्कंठावर्धक होते, कथानक झपाटून टाकते…!

 

   

Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya) । दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया)

100.00

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्वजण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकीगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

Bapu : Akbhashit Chintankavya | बापू : एकभाषित चिंतनकाव्य

100.00

बापू : एकभाषित चिंतनकाव्य (स्मृतिरचना) – महात्मा गांधी यांच्या जीवनातील ७७ प्रसंगांना शब्दरूप देताना रा. ग. जाधव सरांनी ७० वर्षे मनाच्या कोपऱ्यात दडलेले संचित बाहेर काढले आहे.

     

He Mitravarya । हे मित्रवर्या

100.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या ६७ स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.

     

श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas

100.00

‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

आठवणी जुन्या शब्द नवे | Athvani Junya Shabda Nave

100.00

आठवणी जुन्या आणि शब्द नवे. वर्षानुवर्षे कुठेतरी साठवून ठेवलेले आणि साठून राहिलेले हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. भूतकाळात डोकावून पाहताना प्रसंग, चित्रे जशीच्या तशी उभी राहात गेली. आणि नकळत कागदावर उतरत गेली. हे चित्रण म्हणजे केवळ घटनांचे किंवा व्यक्तिरेखांचे वर्णन नसून, त्याच्यामागे असलेल्या मनातील भावनांचा प्रवाह आहे.

     

माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN

100.00

माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी है गेल्या दहा वर्षापासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. “माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.

     

Saleनवी पुस्तके

Vikas Geete | विकास गीते

80.00

आज मराठीमध्ये हेतुपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.

     

1 4 5 6