1965 च्या 2 ऑक्टोबरपासून तीन आठवडे मी भारत- पाक युद्ध आघाडीवर वार्ताहर म्हणून गेलो होतो. त्यावेळी पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले. शिवाय हेही नम्रपणाने सांगावेसे वाटते की, मी केवळ वृत्तपत्रीय निवेदन लिहिलेले नाही. साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे तत्कालिकाचे अवलोकन करताना मानवी मनाच्या अक्षय भावना दर्शवणारे क्षण टिपण्याचा प्रयत्न येथे केला आहे. अनेक व्यक्ती, दृश्ये, घटना आणि संभाषणे अविस्मरणीय वाटली. मनाला लुब्ध करणाऱ्या या गोष्टी वाचकांना सांगाव्या, हाच या निवेदनाचा हेतू आहे. – ग. प्र. प्रधान
₹150.00 ₹120.00
हाजीपीर आणि कांजरकोट | Hajipeer Ani Kanjarkot
पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.
Meet The Author
Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक
टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
नारायणीय – निवडक ना. ग. गोरे | Narayaniya – Nivadak N. G. Gore
कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. – ना. ग. गोरे
स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.
माझी वाटचाल | Mazi Vatchal
जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रीतीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.
सोनार बांगला | Sonar Bangala
1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रमाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 132 |
Related products
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी है गेल्या दहा वर्षापासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. “माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
जिंकुनि मरणाला | Jinkuni Maranala
कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही. वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला. त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत. हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.
– ना. ग. गोरे
Rutu Barawa । ऋतू बरवा
Bapu : Akbhashit Chintankavya | बापू : एकभाषित चिंतनकाव्य
बापू : एकभाषित चिंतनकाव्य (स्मृतिरचना) – महात्मा गांधी यांच्या जीवनातील ७७ प्रसंगांना शब्दरूप देताना रा. ग. जाधव सरांनी ७० वर्षे मनाच्या कोपऱ्यात दडलेले संचित बाहेर काढले आहे.
धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam
‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
माझे पप्पा हेमंत करकरे । Majhe Pappa Hemant Karkare
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले, स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात नऊ अतिरेकी ठार झाले आणि अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत हाती लागला. चार दिवस चाललेल्या त्या धुमश्चक्रीत पावणेदोनशे लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तो दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवरील हल्ला होता, जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली गेली, 26/11 या नावाने तो ओळखला जातो. हेमंत करकरे यांची ओळख भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) कर्तबगार अधिकारी म्हणून महाराष्ट्राला होती. साहजिकच, त्यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतील लहान-थोर हळहळले. त्यांच्या कुटुंबीयांवर तर तो खूपच मोठा आघात होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे (कविता यांचे) धैर्य आणि बाणेदार वर्तन देशभर विशेष आदराचा विषय बनले. त्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांची कन्या जुई हिने हेमंत करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातलग, सहकारी व समाजातील अन्य प्रतिष्ठित लोक यांच्याशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.